
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार नयोमी दशरथ साटम यांनी स्विकारल्यावर भाजपा महिला मोर्चाच्या वतिने जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील वरवडे फळसेवाडी येथील सिंधुकन्या पोलीस खात्यात अप्पर पोलीस अधीक्षक ह्या पदावर काम करते हे सिंधुदुर्गातील समस्त महिला वर्गाला अभिमानाची गोष्ट आहे , असे उद्गगार सत्कार प्रसंगी जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनी काढले .
यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रज्ञा ढवण, जिल्हा पदाधिकारी मेघा गांगण, जिल्हा मोर्चा उपाध्यक्ष सावी लोके, वैभववाडी मंडल अध्यक्ष प्राची तावडे, कणकवलीच्या हर्षदा वाळके, कुडाळच्या आरती पाटील, ओसरच्या सुप्रिया वालावलकर, वेंगुर्लेच्या सुजाता पडवळ, सावंतवाडीच्या मोहिनी मडगावकर, कुडाळच्या साधना माडिये इत्यादी उपस्थित होत्या.