
सावंतवाडी : सिंधुदुर्गात ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले आहे.
एकूण ३२५ पैकी तब्बल १८२ जागा जिंकत भाजपाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
यात त्यांच्या सहयोगी असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाला २४ जागा मिळवता आल्या आहेत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला ७३ जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकाचे यश मिळाले आहे.
दरम्यान ग्राम विकास पॅनेल ३९ जागांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र सर्वात आत्मपरीक्षणाची बाब म्हणजे महाविकास आघाडीला केवळ तीन जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षाला खातेही उघडता आले नाही. असे चित्र असल्यामुळे महाविकास आघाडीची सिंधुदुर्गात अत्यंत दयनीय अवस्था आहे, असेच म्हणावे लागेल.
एकूण ३२५ जागांचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे -
भाजप - १८२
उद्धव ठाकरे गट - ७३
शिंदे गट - २४
ग्रामविकास पॅनेल - ३९
महाविकास आघाडी - ०३
राष्ट्रवादी - ०१
अपक्ष - ०२
काँग्रेस - ००
निवडणुक झालेली नाही - ०१
एकूण - ३२५
अशा एकूण ३२५ जागांचा सविस्तर निकाल लागलेला आहे.