
बांदा : बांदा शहर ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने मोठ यश मिळवत शहर विकास पॅंनलचा धुव्वा उडवला. १५ पैकी ११ जागांवर भाजपने विजय मिळविला. ठाकरे सेनेला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले. एका जागी अपक्ष उमेदवाराने बाजी मारली असून बांद्यात सत्तेची चावी आपल्याच ताब्यात ठेवत बांदा हा आपला बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. सरपंचपदी भाजपच्या प्रियांका नाईक यांनी सेनेच्या अर्चना पांगम यांचा तब्बल १ हजार १६३ अशा विक्रमी मतांनी पराभव केला. प्रियांका नाईक यांना २ हजार ३७३ मते तर अर्चना पांगम यांना १ हजार २१० मते मिळाली.
पहिल्या फेरीला मिळालेली मतांची आघाडी प्रियांका नाईक यांनी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राखल्याने त्यांनी विक्रमी मताधिक्क्याने विजय मिळविला.भाजपने १५ पैकी १० जागांवर विजय मिळविला. भाजपची एक जागा बिनविरोध निवडून आली आहे. शिवसेनेने ३ जागांवर विजय मिळविला तर एका जागी अपक्ष उमेदवाराने बाजी मारलीय. भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.