
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून भाजपच्या कमळ चिन्हावर ही सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेची जागा लढवली जावी.आणी भाजपचा उमेदवार या जागेवर लढला जावा अशी मागणी केली होती. भाजपची ही भूमिका म्हणजे आपल्या मित्र पक्षावर विश्वास नसल्याचे समोर येत आहे. तर शिवसेना मित्र पक्षाचे उमेदवार किरण सामंत यांना उमेदवारी मिळेल म्हणून भाजप कुरघोडी करून सामंताचे तिकीट कापू पाहतय अशी जहरी टिका उबाठा शिवसेनेचे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी केली आहे. ते कुडाळ येथील उबाठा सेनेच्या पक्ष कार्यालयात बोलत होते.