
तर पक्षश्रेष्ठींकडून कारवाई
दोडामार्ग : आडाळी एमआयडीसीमधील खनीज तस्करीमागे आमचा भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही आणि जर तसा कोण आढळल्यास त्याची शाहनिशा करून पक्षश्रेष्ठीकडून कारवाई केली जाणार असल्याचे भाजपचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष दीपक गवस यांनी बोलताना स्पष्ट केले.
ते बोलताना पुढे म्हणाले की, आडाळी एमआयडीसी मध्ये जो प्रकार सुरु आहे तो चुकीचा आहे. यात कुठल्या ही सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असले तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या संदर्भात आम्ही दोडामार्ग तहसीलदार यांची भेट घेतली आणि जो कोण असेल त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तसेच दोडामार्ग नैसर्गिक संपतीचा आपल्या हितासाठी कोण फायदा घेत असेल तर हे चुकीचे आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांच्या सोबत युवा मोर्चा तालुका प्रमुख पराशर सावंत आदी उपस्थित होते.










