गणेश उत्सवापुर्वी खानोलीत पथदिप सुरू करून भाजपाची वचनपूर्ती..!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निधीतून मंजूर..!
Edited by: दिपेश परब
Published on: September 17, 2023 14:31 PM
views 78  views

वेंगुर्ला : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या खासदार निधीतून वेंगुर्ले तालुक्यातील खानोली गावातील सावंतवाडा व धनगरवाडी स्ट्रीट लाईट साठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यानिधीतुन गणपती पुर्वी पथदिप सुरू करून देऊ असे अभिवचन कामाच्या शुभारंभ प्रसंगी भाजपा पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना दिले होते. याची वचनपूर्ती करून गणेशचतुर्थी पुर्वी दोन दिवस अगोदरच दोन्ही वाडीतील पथदिप चालू केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे . 

यावेळी सरपंच प्रणाली खानोलकर यांच्या हस्ते पथदिप सुरू करून उदघाटन करण्यात  आले. यावेळी सरपंच यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांचे आभार मानले. तसेच भाजपाच्या माध्यमातून दुर्गम भागात निधी देऊन ग्रामीण भागातील जनतेची सोय केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. 

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडीस, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, जेष्ठ नेते बाळा सावंत, शक्ती केंद्र प्रमुख सुधीर गावडे, उपसरपंच सुभाष खानोलकर, बुथ प्रमुख बाळु खानोलकर, दिंव्यांग आघाडीचे सुनील घाग, मनोहर खानोलकर, सुनील सावंत,सचिन नार्वेकर, बाबा मोर्ये इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.