विशाल परब यांच्या कार्यालयात भाजपचा स्थापना दिवस उत्साहात

Edited by: विनायक गावस
Published on: April 06, 2024 09:26 AM
views 363  views

सावंतवाडी : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या कार्यालयात भारतीय जनता पक्षाचा ४४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, नंतर स्वतः याच मार्गावर चालणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा आज ४४ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. ज्या पक्षाच्या व्याप्तीची खिल्ली उडवली जायची तो पक्ष आज देशातच नाही तर जगातला सगळ्यात मोठा पक्ष झाला आहे आणि त्याच कारण फक्त एकच आहे की या पक्षाचा केंद्रबिंदू हा पक्षाचा हाडाचा कार्यकर्ता आहे. मला अभिमान आहे की मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे असं मत यावेळी विशाल परब यांनी व्यक्त केले.

तर या पक्षाने समर्पण शिकवलं, या पक्षाने सातत्य शिकवलं, पक्षाने समाजात वावरायला शिकवले. हा पक्ष नसून एक परिवार आहे जो कार्यकर्त्यांना ज्ञान आणि संस्कार देऊन राष्ट्रकार्यासाठी काम करायला प्रेरित करतो असं मत विशाल परब यांनी व्यक्त केल. याप्रसंगी केतन आजगावकर, अमित परब,  श्री.माने आदिंसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.