
दोडामार्ग : दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदाची सोडत जाहीर झाल्यानंतर सभापती पदासाठी प्रत्येकाने दावे करण्यास सुरुवात केली आहे. राजकीय वर्तुळात मोर्चे्बांधणीला सुरुवात झाली असून दोडामार्ग पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकणार असा विश्वास भाजपा युवा मोर्चा दोडामार्ग तालुका उपाध्यक्ष दौलतराव उर्फ दिलखुश देसाई यांनी व्यक्त केला आहे.
दोडामार्ग पंचायत समितीवर आम्ही भाजपाचाच झेंडा फडकवणार व भाजपाचाच सभापती बसणार. सभापती पद हे सर्व साधारण महिला प्रवर्गा जाहीर झालेले असून भाजपाने केलेली विकासात्मक कामे, राज्यात युतीची सत्ता असून आपला भाजप पक्ष सर्वात मोठा पक्ष आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत म्हणूनच पंचायत समिती स्तरावर विकास कामे जलद गतीने होतील. मागील निवडणुकांनाही भाजपाला जनतेने बहूमत दिलेलं आहे. यावेळीही जनता भाजपाला भरघोस मतांनी निवडून देतील यात तिळमात्रही शंका नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.










