
कणकवली: डामरे ग्रामपंचायत वर केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डामरे ग्रामपंचायत वर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचे डांमरे माजी सरपंच बबलू सावंत यांनी सांगितले आहे. या ग्रामपंचायत तीमध्ये आमदार नितेश राणे व माजी आमदार प्रमोद जठार यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त विकास कामे झाली आहेत. त्यामुळेच सरपंच पदाचे उमेदवार किरण सिताराम कानडे, सदस्य संतोष अरविंद मेजरी, भाग्यलक्ष्मी महादेव कानडे, रिया रोहिदास गुरव, सागर जयवंत साटम, भाग्यश्री भिकाजी सावंत, विनिता विनोद सावंत यांना ग्रामस्थांचा पाठिंबा मिळत असल्याने या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवारासह सर्व सदस्य बहुमताने विजयी होतील व पुढील काळात ग्रामस्थांच्या हिताची कामे करतील असे डांमरे माजी सरपंच बबलू सावंत यांनी सांगितले आहे.