
कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे देऊळवाडी येथे रहिवासी प्रमोद बांबर्डेकर यांच्या राहत्या घरास आग लागण्याची घटना सोमवारी सुमारास घडली होती. या आगीत घरातील कपडे, भांडी, टीव्ही, सोफा, टेबल, फर्निचर, कौले, वायरिंग, महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाले. या दुर्घटनेत प्रमोद बांबर्डेकर यांचे अंदाजे ९० हजाराचे नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने आज भाजप ओरोस मंडलतर्फे प्रमोद बांबर्डेकर यांना प्राथमिक स्वरुपात आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष भाई सावंत, सुप्रिया वालावलकर, छोटू पारकर, सुनील जाधव, उदय जांभवडेकर, अमित भोगले, दिनेश जैतापकर, शैलेश बांबर्डेकर, अरविंद बांबर्डेकर, सुष्मिता बांबर्डेकर, दशरथ कदम, प्रसाद बांबर्डेकर आदी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.