मालवणात सौरभ ताम्हणकर यांचा मित्रमंडळासह भाजप प्रवेश

भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केलं स्वागत
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 16, 2022 17:32 PM
views 175  views

मालवण : मालवण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांनी मित्रमंडळासह रविवारी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला.


मालवण येथील निलरत्न निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगरसेवक दीपक पाटकर, अशोक तोडणकर, मोहन वराडकर, रवी मालवणकर, गौरव लुडबे, युवमोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण यासह अन्य उपस्थित होते.


भाजप प्रवेशकर्ते सौरभ ताम्हणकर यांच्यासह निषय पालयेकर, राकेश सावंत, फ्रान्सिस फर्नांडिस, चंद्रकांत मयेकर, तुषार वाघ, जलेंद्र करंगुटकर, अनिकेत धुरी, चिन्मय ढोलम, कुणाल खानोलकर, निनाद बादेकर, पंकज गावडे, पराग परब, राज कांदळकर, हर्षद तळवडेकर, रुपेश कांबळी, दादा कोचरेकर आदींनी सौरभ यांच्यासह भाजप पक्षात प्रवेश केला. यावेळी निलेश राणे यांनी।सर्वांचे स्वागत केले. 


शहर तालुक्यात भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून संघटना अधिक वाढवा. जोमाने काम करा. वरिष्ठ स्तरावरून पक्ष संघटना माध्यमातून जे कार्यक्रम येतील ते प्रभावीपणे राबवा. सतत जनसेवेसाठी कार्यरत रहा. यासह अन्य मार्गदर्शन निलेश राणे यांनी केले.