ठाकरे सेनेला राणेंचा धक्का !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 24, 2023 20:12 PM
views 217  views

वैभववाडी : वैभववाडी नगरपंचायतीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दोन नगरसेवक व एक अपक्ष नगरसेवक असे मिळून तीघांनी भाजपात प्रवेश केला आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश केला आहे.यामध्ये प्रदीप रावराणे, श्रद्धा रावराणे ह्या ठाकरे गटाच्या नगरसेवक आहेत तर सुभाष रावराणे हे अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते.आता नगरपंचायतीत भाजपचे संख्याबळ १०वरून १३ झाले आहे.या प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

   शिवसेना फुटीनंतर ठाकरे शिवसेनेला लागलेली गळती अद्याप काही थांबत नाही.वैभववाडी नगरपंचायतीच्या दोन नगरसेवकांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सेनेला पुन्हा धक्का दिला आहे.शिवसेनेसह अपक्ष नगरसेवक भाजपावासी झाले आहेत.आज मुंबईत नारायण राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.त्याननतर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली.यावेळी आ.नितेश राणे, रोहीत रावराणे,माजी नगरसेवक संतांजी रावराणे, आशिष रावराणे आदी उपस्थित होते.