
दोडामार्ग : भाजपा दोडामार्ग तालुक्याची नवीन कार्यकारिणीची नुकतीच जाहीर करण्यात आली असून, यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण करण्याच्या दृष्टीने ही कार्यकारिणी महत्त्वाची मानली जात आहे.
भाजपा कार्यालयात जिल्हा सरचिटणीस महेश सारंग व तालुकाध्यक्ष दीपक गवस यांच्या अध्यक्षतेखाली नूतन कार्यकारिणी निवड संदर्भात गुरुवारी सायंकाळी एक बैठक संपन्न झाली. यावेळी सोबत नगराध्यक्ष चेतन चव्हाण उपस्थित होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार, जिल्हा नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी निश्चित करण्यात आली. यामध्ये अनुभवी कार्यकर्त्यांसोबतच युवा नेतृत्वालाही स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे तालुकास्तरावर पक्षाची धुरा अधिक सक्षमपणे पार पाडली जाईल, अशी अपेक्षा यावेळी महेश सारंग यांनी व्यक्त केली.
भाजपा दोडामार्ग तालुका कार्यकारिणी पुढील प्रमाणे
तालुका उपाध्यक्षपदी आनंद अंकुश तळणकर, संतोष वसंत आईर, सुनील शंकर गवस, संतोष विश्राम म्हावळणकर, संध्या राजेश प्रसादी, आकांशा महेंद्र शेटकर; सरचिटणीस पदी सिद्धेश पांगम, संजय पांडुरंग सातार्डेकर; चिटणीस पदी सूर्यकांत दत्ताराम धर्णे, संतोष दत्ताराम नाईक, कल्पना बबन बुडकुले, वैभव वसंत सुतार, क्रांती महादेव जाधव, स्वाती सुंदर गावकर; कोषाध्यक्षपदी स्वप्निल सगुण गवस; सदस्य पदी प्रकाश वासुदेव कदम (अनुसूचित जाती व जमाती मोर्चा तालुकाध्यक्ष), दीक्षा लक्ष्मण महालकर (महिला तालुकाध्यक्ष), पराशर जगन्नाथ सावंत (युवा मोर्चा तालुकाध्यक्ष), मोहन भिकाजी देसाई (किसान मोर्चा तालुकाध्यक्ष), अंकुश गुरुनाथ नाईक (ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष), नितीन प्रभाकर मणेरिकर, रामचंद्र शशिकांत मणेरिकर, प्रकाश सावंत, सुधीर सुरेश पनवेलकर, देविदास कृष्णा गवस, विशाल विनय मणेरीकर, सोनल सुनील म्हावळणकर, रवी नाना जंगले, धाकू देऊ कुंभार, संजय नारायण उसपकर, संजय दत्ताराम मळीक, शैलेश शांताराम बोर्डेकर, श्रुती विठ्ठल देसाई, सुमित सुरेश म्हाडगुत, प्रथमेश गजानन मणेरिकर, सुनिल भिकाजी गवस, विवेक सिताराम सुतार, साक्षी संदीप देसाई, प्राची अशोक परब, लक्ष्मण गावडे, सूर्याजी विनायक झेंडे, चंद्रकांत लक्ष्मण खडपकर, चंद्रकांत भिवा गवस, प्रशांत नारायण गवस, गणेश अनिल बेळेकर, मानसी महेश गवस, अजित शिवप्पा मुरगुडी, सुषमा प्रदीप सावंत, शाबी यशवंत तुळसकर, जान्हवी भिकाजी देसाई, आरती दमण्णा कांबळी, गुणवंती भिकाजी कदम, शुभलक्ष्मी विष्णू देसाई, विद्या वासुदेव भावे, सुमित भाडगुत, करुणा कृष्णा दळवी, हसीना अन्वर शेख, रुक्मिणी पांडुरंग नाईक, भाग्यलक्ष्मी नारायण कळणेकर, अंजू महादेव गवस, दिनेश अनंत नाईक, कृष्णा वसंत शिरोडकर.