
सावंतवाडी : ग्रामपंचायत निवडणुकीत मडुऱ्यात भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब सकाळपासून मतदान केंद्रावर तळ ठोकला आहेत. संजू परब यांनी आपल्या पॅनलला विजयी करण्यासाठी वयोवृद्धांना देखील बाहेर पडत मतदानास पुढाकार घेतला. गावात मतदारांनी उत्स्फूर्त असं मतदान केले. त्यामुळे संजू परब यांच्या पॅनलचा विजय निश्चित असल्याचा दावा येथील कार्यकर्त्यांनी केला.
संजू परब यांच्या पॅनलचे प्रमुख तथा भाजप सातार्डा शक्ती केंद्रप्रमुख यशवंत माधव यांनीही जवळजवळ आपला विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया दिली. गावात अनेक ठिकाणी मतदानासाठी येणाऱ्या वयोवृद्धांना मदतीचा हात देऊन संजू परब यांनी सामाजिक बांधिलकी देखील जपली.