
कणकवली : माजी सभापती मनोज रावराणे यांची नुकतीच भाजपा जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा दौऱ्यावर असलेले आमदार नितेश राणेंची ओम गणेश बंगल्यावर सदिच्छा भेट आशीर्वाद घेतले. आमदार नितेश राणे यांनी मनोज यांना पक्षसंघटनेसाठी झटून काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत, माजी सभापती प्रकाश सावंत, माजी उपसभापती दिलीप तळेकर, भाजपा उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत, बँक संचालक ऍड समीर सावंत, विठ्ठल देसाई, बबलू सावंत, सूर्यकांत भालेकर, बबन हळदीवे, संजय देसाई, संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते. मनोज रावराणे यांनी कणकवली विधानसभा संयोजक पदी आदर्शवत काम केल्यामुळे त्यांच्या पक्षनिष्ठेची आणि कार्यपद्धतीची दखल घेत जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मनोज रावराणे यांची भाजपा जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती केली. भाजपा लोकसभा प्रवास योजना चे प्रदेश संयोजक बाबासाहेब भेगडे यांच्या हस्ते रावराणे याना जिल्हा सरचिटणीस नियुक्तीपत्र देण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा दौऱ्यावर असलेल्या आमदार नितेश राणेंची आज मनोज रावराणे यांनी आज सदिच्छा भेट घेत आशीर्वाद घेतले.