भाजपकडून प्रमोद जठार यांचे नाव विधानपरिषदसाठी निश्चित

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 28, 2026 22:19 PM
views 34  views

कणकवली : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. विधान परिषद निवडणुक येत्या १२ मे रोजी होणार आहे. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी कणकवली विधानसभेचे माजी आमदार प्रमोद जठार यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे

प्रमोद जठार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले नेतृत्व आहे. अतिशय अभ्यासू आणि आक्रमक राजकारणी म्हणून प्रमोद जठार यांना ओळखले जाते. कॉलेज जीवनापासून त्यांनी भाजपचे काम केले. कोकणात भाजपचा आक्रमकपणे विस्तार करण्यात जठार यांचा सिंहाचा वाटा आहे.

पडत्या काळात भाजप पक्ष तळागाळात पोहोचवण्याचे काम त्यांनी केला आहे त्यामुळेच त्यांनाही संधी मिळाली आहे असं कार्यकर्त्यांचा मत आहे