वेंगुर्लेत भाजपच्यावतीने 'ऑपरेशन सिंदुर'चा जल्लोष

Edited by: दिपेश परब
Published on: May 07, 2025 16:26 PM
views 265  views

वेंगुर्ला : भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून "ऑपरेशन सिंदूर"  ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलाने ६ मे मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. मध्यरात्री १.२८ वाजता ऑपरेशन सिंदूर सुरू होऊन १.५१ वाजता ते यशस्वीरित्या पूर्ण झाले. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं. उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं.

आज दिनांक ७ मे २०२५ रोजी भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला तालुका कार्यालय येथे वेंगुर्ला तालुका पदाधिकारी  व कार्यकर्ते यांच्या वतीने विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पपू परब, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, माजी तालुकाध्यक्ष  सुहास गवंडळकर, जिल्हा निमंत्रित साई प्रसाद नाईक, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा कार्यकारणी सदस्य वसंत तांडेल, मनवेल फर्नांडीस, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत गावडे, युवामोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, मनोहर तांडेल, प्रीतम सावंत, वैभव होडावडेकर, हसीनबेगम मकानदार, दादा केळूसकर , सायमन आल्मेडा, शितल आंगचेकर, सुभाष खानोलकर, सुनील घाग , कार्तिकी  पवार, स्वरा  देसाई, गणेश गावडे, पुंडलिक हळदणकर, कृष्णा हळदणकर, सत्यवान  पालव,  राहुल मोर्डेकर, तेजस  कुंभार, रवींद्र शिरसाट, नामदेव सरमळकर, सत्यविजय गावडे, राजबा  सावंत,  कृष्णाजी सावंत, अजित  कनियाळकर, आदित्य मांजरेकर, रफीक शेख, नितीन लिंगोजी, अक्षय  परब, महेश प्रभुखानोलकर , रामचंद्र  गावडे आदी  कार्यकर्ते उपस्थित होते.