भाजपच्या बुथ सक्षमीकरण अभियानाला प्रारंभ !

दोन दिवसांत बुथ गठीत करण्याचा 4 तालुक्यांच्या बैठकीत निर्धार
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 27, 2022 08:10 AM
views 439  views

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग यांच्या बूथ सक्षमीकरण अभियानाअंतर्गत सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ व‌ मालवण तालुक्याची बैठक जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या अध्यक्षतेखाली शिल्पग्राम, सावंतवाडी येथे पार पडली. यावेळी बुथ सक्षमीकरणासाठी येत्या दोन दिवसांत सर्व बूथ गठीत करण्याबाबतचा निर्धार करण्यात आला.

यावेळी जिल्ह्याचे बुथ संयोजक महेश सारंग, आयटी सेलचे प्रमुख केशव नवाधे, सावंतवाडी मंडल अध्यक्ष महेश धुरी, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगांवकर, दोडामार्ग मंडळ अध्यक्ष सुधीर दळवी, एकनाथ नाडकर्णी, कुडाळ मंडळ अध्यक्ष दादा साईल, विनायक राणे, बंड्या सावंत, दीपक नारकर, मालवण मंडळ अध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगरसेवक अँड.परिमल नाईक, सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, अँड. संजू शिरोडकर, प्रमोद गावडे, गुरूनाथ पेडणेकर, चंद्रकांत जाधव, अजय सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.