100 मच्छिमारांचा भाजपात प्रवेश

भाजपा बुथ कमीटी अध्यक्षपदी किशोर रेवंणकर तर उपाध्यक्ष पदी दादा मोटे यांची निवड
Edited by: दिपेश परब
Published on: October 05, 2024 14:21 PM
views 74  views

वेंगुर्ला :  पंतप्रधान नरेंद्र मोदीं हे मच्छिमारांचे व शेतकऱ्यांचे तारणहार आहेत . मोदीजींनी २०१४ साली सर्वप्रथम पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यापासून गेल्या दहा वर्षांत मच्छिमार व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. मोदी सरकारने मच्छिमार व शेतकऱ्यांचा व्यापक हिताचा जेवढा विचार केला व त्यासाठी ज्या प्रमाणात योजना राबविल्या तेवढे काम आतापर्यंत अन्य कोणत्याही सरकारने केले नव्हते . पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेमुळे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या प्रमाणात वृद्धी झाल्याने उत्पन्नातही वाढ झाली आहे . स्वातंत्र्यानंतर मत्स्यपालन क्षेत्रात एकाच वेळी २० हजार कोटी रुपयांहुन अधिक गुंतवणूक करण्यासंबंधी ही पहिलीच योजना आहे . या योजनेंतर्गत मत्स्यपालक, मच्छिमार आणि जल कृषी क्षेत्राला पुरेशी मदत दिल्याने त्यांच्या उत्पन्नात आणि रोजगारात वाढ झाली आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील शाश्वतता , उत्पादकता आणि उत्पंन्न वाढविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार ने इतर अनेक योजना सुरु केल्या आहेत , त्याचा जास्तीत जास्त मच्छिमारांनी फायदा घ्यावा असे प्रतिपादन  भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी भाजपा प्रवेश कार्यक्रम दरम्यान केले . यावेळी व्यासपीठावर तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , ग्रामपंचायत सदस्या अस्मीता मेस्त्री , ओबीसी सेल अध्यक्ष रमेश नार्वेकर , बुथ प्रमुख बाबुराव मेस्त्री उपस्थित होते .

  यावेळी बुथ अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल किशोर रेवंणकर यांचा ह.भ.प.सावळाराम कुर्ले महाराज  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मच्छिमार नेते वसंत तांडेल म्हणाले की आपल्या समाजातील बहुसंख्य मंडळी ही वारकरी संप्रदायातील आहेत. आपल्यातील जेष्ठ नागरिकांसाठी  महाराष्ट्रातील महायुती सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु केली आहे .भारतातील एकूण ७३ व महाराष्ट्र राज्यातील ६६ तीर्थक्षेत्रांचा या योजनेंतर्गत सामावेश केला आहे . त्यानुसार जेष्ठ नागरिकांसाठी तिर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देण्यात आली असुन जास्तीत जास्त वारकरी संप्रदायातील मंडळींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

 यावेळेस मार्गदर्शन करताना ह.भ.प.सावळाराम कुर्ले महाराज म्हणाले कि आपली ही पिढी नशीबवान आहे , कारण आपल्याला पंतप्रधान पदी नरेंद्र मोदीं सारखा विश्वविख्यात लोकप्रिय नेता लाभला. त्यामुळेच संपुर्ण जगात आपल्या देशाचे महत्व वाढले . भाजपा कडे हिंदुत्वाच्या विचारांचा भक्कम आधार आहे त्यामुळेच अयोध्येत भव्य श्रीराममंदीर होऊ शकले . अशा हिंदुत्ववादी पक्षाच्या पाठीमागे हिंदु धर्मियांनी उभे राहीले पाहिजे, असे आवाहन केले .

यावेळी गजानन कुबल, गुरुनाथ बांदेकर, तुकाराम तांडेल, दिवाकर कुर्ले, सुरेश कुबल, नामदेव तांडेल , पांडुरंग मोंडकर , भानुदास आरोंदेकर, विठ्ठल भुते, सुधाकर कुर्ले, पंढरीनाथ कोचरेकर, किर्ती कुर्ले , दिपाली कुर्ले, सायली मसुरकर, निलम कुर्ले , दिव्या कुर्ले , गौरी रेवंणकर , प्राची सारंग , उल्का कुबल , अनुश्री तांडेल इत्यादी १०० महीला व पुरुष उपस्थित होते.