
सावंतवाडी : शहरातील माठेवाडा मदारी रोड कॉलनी येथील रहिवासी प्रदीप नाईक यांच्या घराच्या परिसरात गवा रेड्यांच्या कळपाचे आगमन झाले.
नरेंद्र डोंगरांमध्ये या गव्यांच वास्तव्य असून गेले काही दिवस ते पायथ्याशी दिसून येत आहेत. माठेवाडा येथे मोठा कळप दिसून आल्याने परिसरात भितीच वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने यावर उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे