...असा होणार जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचा वाढदिवस !

Edited by: दिपेश परब
Published on: August 01, 2023 17:01 PM
views 382  views

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या बुधवार दिनांक २ ऑगस्ट रोजी मनिष दळवी मित्रमंडळ यांच्यामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तुळस जिल्हा परिषद मतदार संघात शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच तालुक्यात ठिकठिकाणी मनिष दळवी मित्रमंडळ यांच्या वतीने विद्यार्थी गौरव, अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना आर्थिक मदत, वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम करण्यात येणार आहेत. तसेच सायंकाळी ७ वाजता सावंतवाडी मळगाव येथील शालू मंगल कार्यालयात वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मनिष दळवी मित्रमंडळ यांच्या वतीने देण्यात आली आहे.