
सावंतवाडी : नगरसेवक अजय गोंदावळे यांचा वाढदिवस आज शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संजू परब यांनी गोंदावळे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच विविध स्तरातूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून या निमित्ताने त्यांनी सामाजिक उपक्रम देखील राबवले.










