जन्म - मृत्यू प्रमाणपत्र मिळणार वेबसाईटवर

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 03, 2023 13:40 PM
views 484  views

सिंधुदुर्गनगरी : केंद्र शासनामार्फत सर्व राज्यांसाठी जन्म व मृत्यू नोंदणी तसेच जन्म अथवा मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी अधिकृत crsorgi.gov.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. मात्र काही ठिकाणी जन्म व मृत्यूचे बनावट प्रमाणपत्र देणारी संकेतस्थळे सक्रीय असल्याचे आढळल असून केंद्र शासनाकडून अशी काही बनावट संकेतस्थळे जाहीर करण्यात आली आहेत. अशा संकेतस्थळांपासून नागरिकांनी सावध राहावे केवळ crsorgi.gov.in अधिकृत संकेतस्थळावर जन्म अथवा मृत्यू नोंदणी करुन त्याव्दारे प्राप्त होणा-या जन्म व मृत्यू दाखला घेण्यात यावा असे आवाहन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे यांनी केले आहे.

 केंद्र शासनामार्फत सर्व राज्यांसाठी जन्म व मृत्यू नोंदणी तसेच जन्म अथवा मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी अधिकृत crsorgi.gov.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये सन २०१६ पासून या संकेत स्थळाचा वापर जन्म मृत्यू नोंदणीसाठी केला जात आहे. जिल्हयातील शहरी भागामध्ये सर्व नगर परिषद व नगर पंचायत, ग्रामीण भागामध्ये सर्व ग्राम पंचायत तसेच सर्व शासकीय आरोग्य संस्था या नोंदणी केंद्रामध्ये जन्म-मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्र देण्यासाठी या संकेतस्थळाचा वापर करण्यात येत आहे. मात्र काही ठिकाणी जन्म व मृत्यूचे बनावट प्रमाणपत्र देणारी संकेतस्थळे सक्रीय असल्याचे आढळल असून केंद्र शासनाकडून अशी काही बनावट संकेतस्थळे जाहीर करण्यात आली आहेत. अशा संकेतस्थळांपासून नागरिकांनी सावध राहावे केवळ crsorgi.gov.in अधिकृत संकेतस्थळावर जन्म अथवा मृत्यू नोंदणी करुन त्याव्दारे प्राप्त होणा-या जन्म व मृत्यू दाखला घेण्यात यावा.

 जन्म अथवा मृत्यू घटना घडताच २१ दिवसांच्या आत त्याची नोंदणी संबंधित शासकीय संस्था, ग्रामीण किंवा शहरी स्वराज्य संस्था या ठिकाणी नोंदणी करून घेऊन त्याच ठिकाणहून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. इतर कोणत्याही पद्धतीने किंवा संकेतस्थळावरून घेतलेले प्रमाणपत्र हे यापुढे ग्राह्य धरण्यात येणारा नाही. तथा सुचना ३१ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या जन्म न मृत्यू नोंदणी जिल्हास्तरिय समन्वय समिती सभेमध्ये देण्यात आल्या आहेत

 तसेच नागरिकांनी जन्म अथवा मृत्यूची नोंदणी crsorgi.gov.in या संकेतस्थळावर जिल्हयातील नियुक्त निबंधक जन्म-मृत्यू यांचे मार्फतच करून घ्यावी नोंदणी २१ दिवसाच्या आत करावी. जन्म व मृत्यू प्रमाण पत्राची प्रथम प्रत नागरिकाना मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी आपल्या नजिकच्या ग्रामिण अथवा शहरी स्वराज्य संस्था अथवा शासकिय आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा आवाहन देखील करण्यात आले आहे.

जन्म नोंदणी २०२६ पर्यंत मुदतवाढ 

       जन्म झालेल्या तारखेपासून १५ वर्षाच्या आत नोंदणी करता येते काही घटनांच्या बाबतीत वरील कालमर्यादा उलटून गेल्यावर बाळाच्या नावाची नोंदणी करण्याचे राहून जाता असल्याने केंद्र २७ एप्रिल २०२६ पर्यंत मुदत वाढ दिली आहे.

बनावट संकेतस्थळे जागरुक रहा 

        CRSORGIGOOVLIN, BIRTHDEATHONLINE.COM CRSRGIN या संकेतस्थळावरून बनावट प्रमाणपत्रे दिली संकेतस्थळापासून जातात. अशा सावध राहावे कोणत्याही खाजगी संस्था अथवा इतर अनोळखी व्यक्तीकडून मोबदला देऊन जन्म-मृत्यू प्रमाणपत्र काढून घेऊ नये ल्याऐवजी योग्य माहितीसाठी जिल्हा निबंधक जन्म-मृत्यू तथा जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयाशी संपर्क साधावा.