कलमठमध्ये एकाच जागी मिळतील उत्पन्नाचे दाखले !

सरपंच संदिप मेस्त्री यांचा पुढाकार
Edited by: उमेश बुचडे
Published on: July 02, 2024 07:54 AM
views 140  views

कलमठ : कलमठमध्ये एकाच जागी मिळतील उत्पन्नाचे दाखले मिळतील. ग्रामपंचायत हॉलमध्ये हे शिबीराचे आयोजन करण्यात आलंय. यासाठी सरपंच संदीप मेस्त्री यांनी पुढाकार घेतलाय.  

सकाळी ९:३० ते ५ पर्यंत हे शिबिर होणार आहे. तलाठी, ग्रामविकास अधिकारी ,ग्रामपंचायत सदस्य, सेतू मित्र अंगणवाडी सेविका ,मदतनीस ग्रामपंचायत कर्मचारी सहकार्य साठी उपस्थित राहणार आहेत. कलमठ गावातील सर्व महिला भगिनींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपसरपंच स्वप्नील चिंदरकर यांनी केले आहे. 

 लाभार्थ्यांनी उत्पन्न  दाखलासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, असेसमेंट व फोटो घेऊन येणे असे आवाहन सरपंच संदीप मेस्त्री यांनी केले आहे.