
सावंतवाडी : वनविभाग सावंतवाडी, संत राऊळ महाराज कॉलेज कुडाळ - माय वे जर्नी ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नरेंद्र डोंगरावरील जैवविविधतेचा अभ्यासदौरा व निसर्गभ्रमंतीचं १६ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आल आहे. विद्यार्थी व निसर्गप्रेमी यांच्यासाठी नरेंद्र डोंगराच्या जैवविविधतेला जाणून घेण्याची सुवर्णसंधी आहे.
वनस्पती, कीटक, कोळी, सरडे, पाली, बेडूक, साप व पक्षी यांचा जवळून अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळी 9 ते 11 जंगलफिरती व नरेंद्रडोंगरावरील जैवविविधतेची ओळख, दुपारी 11 ते 01 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्मिळ जैवविविधता-वनस्पती, पक्षी व प्राणी प्रजातींची ओळख दुपारी 01 ते 02 वनभोजन व विश्रांती दुपारी 02 ते 04
चर्चासत्र-पर्यावरणरक्षण व निसर्गसंवर्धन यामध्ये एक सुजाण नागरिक म्हणून पार पाडावयाची आपली कर्तव्ये.सायंकाळी-04 ते 05 दिवसभर झालेल्या चर्चेवर प्रश्नमंजुषा, विजेत्यांना पारितोषिक व चहापानाने सांगता
सहभागी विद्यार्थी व निसर्गप्रेमी यांनी सोबत रेनकोट, छत्री, पाण्याची बॉटल, शूज, नोंदवहीइत्यादी गोष्टी ठेवाव्या याची प्रवेश फी- ३०० रू. प्रति व्यक्ती (सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण व सायंकाळी चहा सहीत ) फक्त ठरावीक जागांकरिता ही संधी आहे. अधिक माहितीसाठी डॉ. योगेश कोळी- ९४२१२२४८००; मदन क्षीरसागर (वनपरिक्षेत्र, सावंतवाडी)- ९४२०४२७३३५ यांच्याशी संपर्क साधण्याच आवाहन करण्यात आले आहे.