महिलांसाठीच विधेयक क्रांतिकारक पाऊल : श्वेतल कोरगावकर

Edited by: विनायक गावस
Published on: September 20, 2023 18:46 PM
views 85  views

सावंतवाडी : भारतीय संसदेच्या विशेष अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी " नारी शक्ती वंदन  अधिनियम" या नावाने महिला आरक्षणाचे विधेयक मांडले. देशातील महिलांना लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33% आरक्षणाच्या विधेयकाची घोषणा केली.

लोकशाहीत महिलांचा सहभाग जास्तीत जास्त वाढविण्याच्या हेतूने मोदींनी आणलेले विधेयक हे मोठे क्रांतिकारक पाऊल आहे. स्त्री आणि पुरुष यांची समानता ही नक्कीच जपली जाईल याची खात्री आहे. नवीन संसद भवनात  सादर होणारे पहिले विधेयक Women Reservation Bill प्रत्येक महिलेसाठी अभिमानास्पद आहे असं मत सिंधुदुर्ग महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा श्वेतल शिरोडकर यांनी व्यक्त करत केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींना धन्यवाद दिले आहेत‌