
कणकवली: जानवली येथून कळसुली येथे 'रॉंग साईड'ने जात असलेल्या दुचाकीची समोर येणाऱ्या ट्रकला धडक बसली कणकवली शहरातून गेलेल्या उड्डाण पुलावर, बस स्थानकासमोर शुक्रवारी सायंकाळी ७.४५ वा. सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकीवरील शामसुंदर नाना दळवी (75, रा. कळसुली) हे मृत्यूमुखी झाले. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ तसेच कळसुली ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अपघातानंतर शामसुंदर यांना तात्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील तपासणीअंती शामसुंदर मृत्यूमुखी पडल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कणकवली पोलीसही कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते.