
सावंतवाडी : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने नागरिकांत मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत शहरात बाईक रॅलीचे आयोजन केले होते. या बाईक रॅलीत सावंतवाडी नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी व शहरातील शासकीय कार्यालयाचे कर्मचाऱ्यानी सहभाग घेतला.
निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार श्रीधर पाटील, सहा निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे या बाईक रॅलीसाठी उपस्थित होते.
बाईक रॅलीचा शुभारंभ सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी श्री. जिरगे यांच्या हस्ते झेंडा दाखवून बाईक रॅलीचा सुरवात करण्यात आली. या बाईक रॅलीची सुरुवात जनरल जगन्नाथराव भोसले स्मृति शिवउद्यान येथून होऊन टोपावाला स्मारक तंत्रनिकेतन विद्यालय ते वन विभाग कार्यालय ते शिरोडानाका ते निंबाळकर पिर ते होळीचा खुंट ते आत्मेश्वर मंदिर ते परुळेकर हॉस्पिटल ते कोलगांव दरवाजा ते राजवाडा ते जि. प. शाळा क्र. 4 ते गोठण ते शिल्पग्राम ते जनरल जगन्नाथराव भोसले स्मृति शिवउद्यान येथे समारोप करण्यात आला.या बाईक रॅलीच्या माध्यमातून मतदार जनजागृती करताना सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या निवडणुकीत मंगळवार 02 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या मतदानात शहरातील जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा असे अवाहन करण्यात आले. बाईक रॅलीत नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी तसेच टोपीवाला स्मारक आय. टी आय चे कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपरिषदेच्या प्राची पाटील, एकनाथ पाटील व सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन परब यांनी केले.












