
सावंतवाडी : माझा विजयाचे श्रेय महायुतीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, सावंतवाडीच्या जनतेला देतो. कुडाळमधून निलेश राणे विजयी झाले याचा मला सर्वाधिक आनंद झाला. नितेश राणे यांचा विजय निश्चित होता. कोकणात महायुतीचा विजय झाला आहे. खरी शिवसेना कोणाची हे जनतेन सिद्ध केलं आहे. खासदार आणि तिन्ही आमदार आमचे आहेत. त्यामुळे येत्या एका वर्षात सर्वांगीण विकास सिंधुदुर्गचा होईल असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.