मोदी सरकारचं शेतकऱ्यांसाठी मोठे कार्य : उमेश सावंत

Edited by: दिपेश परब
Published on: April 05, 2024 12:16 PM
views 174  views

वेंगुर्ले : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी गेल्या दहा वर्षांत केलेले काम ऐतिहासिक आहे . शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये थेट मदत देण्याची प्रधानमंत्री किसान सन्मान योजना मोदी सरकार ने अंमलात आणली . त्याला जोड म्हणून शिंदे  - फडणवीस सरकारनेही तितकिच रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान योजना लागु केली आहे . मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी खुप मोठे विकास कार्य केल्यानंतर आता पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र ही योजना सुरु केली . शेतकऱ्यांना सर्व सेवा एकाच ठिकाणी पुरवण्यासाठीची ही योजना आहे . किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या भरघोस कार्याची माहीती जनतेपर्यंत पोहोचून पुन्हा एकदा मोदी सरकार आणण्यासाठी झोकुन देऊन काम करावे , असे आवाहन किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी वेंगुर्लेत किसान मोर्चा मेळाव्यात केले.

यावेळी वेंगुर्ले तालुका किसान मोर्चा कार्यकारिणी जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली .यावेळी तालुकाध्यक्ष पदी संतोष सीताराम शेटकर ( तुळस ) , उपाध्यक्ष पदी सूर्यकांत पुंडलिक परब ( वजराठ ) व देवु तुकाराम गावडे  ( अणसुर ) , सरचिटणीस शिवराम महादेव गावडे ( मठ ) , चिटणीस सत्यवान शिवराम पालव ( मोचेमाड ) , कोशाध्यक्ष महादेव पांडुरंग नाईक ( आरवली ) , सदस्य म्हणून गुंडु शांताराम गावडे ( मोचेमाड ) ,अनिल सदाशिव बागकर  ( टाक ) , राजेंद्र गावडे  ( आसोली ) , जनार्दन राऊळ  ( वेतोरे ) , बाबली गावडे ( तुळस ) , राघोबा दळवी ( होडावडा ) , सौ.अर्पणा आनंद बोवलेकर ( वजराठ ) , रामचंद्र कृष्णा गावडे  ( वेतोरे ) यांची निवड करण्यात आली.

यावेळी भाजप प्रदेश का.का.सदस्य शरद चव्हाण , जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई , किसान मोर्चा प्रदेश का.का.सदस्य प्रप्फुल प्रभाकर प्रभू , किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस गुरुनाथ पाटील , किसान मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष अमृत चौगुले , जिल्हा चिटणीस विजय महादेव रेडकर , जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस , जि.का.का.सदस्य आनंद जयवंत गावडे , महीला ता.अध्यक्षा सुजाता पडवळ ,  अरुण ठाकूर ,आरोलकर नर्सरीचे शिवराम महादेव आरोलकर, महादेव पांडुरंग नाईक, किर्तीमंगल दिपक भगत,  सुनील धोंडू घाग ,खानोली सरपंच शुभाष हरी खोनालकर, उदय अनंत गावडे , वसंत पुंडीलक परब , सुर्यकांत पुंडलिक परब, अणसुर सरपंच सत्याविजय गावडे, राघोबा शिवराम नाबर, ज्योती राजेश देसाई, संदीप लवू देसाई, सत्यवान शिवराम पालव , शेतकरी संघटनेचे श्यामसुंदर कृष्णा राय, रमेश ह. आमडोसकर, हरिश्चंद्र विष्णू राऊळ, गजानन सहदेव राऊळ, दशरथ यशवंत परब, वामन लक्ष्मण गावडे, प्रशांत अंकुश नवार, दयानंद आत्माराम नवार, नित्यानंद लक्ष्मण आजगावकर, राजन श्यामराव नवार, आनंद आत्माराम नवार, सोमा दत्ताराम मेस्त्री , सुप्रिया सोमा मेस्त्री, नारायण पांडुरंग गावडे, अरविंद सदाशिव नवार, मधुकर रामदास सुर्वे, संभाजी महादेव परब, शक्तिकेंद्र प्रमुख गणेश मनोहर गावडे , सुहास अर्जुन नवार, सिताराम अंकुश नवार , नारायण परब , प्रभाकर ज्ञानदेव गावडे, सुप्रिया सोमा मेस्त्री, भास्कर मधुकर गावडे, देऊ तुकाराम गावडे.इत्यादी किसान मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .