
पेण : रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा राज्याला हादरवून सोडणारी घटना घडली आहे. पेणजवळील भोगावती नदीच्या पात्रात स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. मुंबई-गोवा हायवेवरची दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे, तसंच घटनास्थळी बॉम्बशोधक पथकही दाखल झालं आहे. गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही स्फोटके दिसून आली. परिसरातील ग्रामस्थांचे भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान स्फोटके असल्याची माहिती मिळताच पेण पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह पोलीस अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, प्रांत विठ्ठल इनामदार, तहसिलदार प्रसाद कालेकर यांनी ताततीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. बॉम्ब शोधक पथकासही पाचारण करण्यात आले होते.