
कणकवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कोकण दौरा पुर्वनियोजित असुनही अनेक पदाधिकारी बैठकीला उपस्थित न राहील्याबददल राज ठाकरे सिंधुदुर्गातील पदाधिका-यांवर नाराज होते. याबाबतची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली होती. दरम्यान, त्यानंतर काही वेळातच राज ठाकरे यांनी मनसेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्याची माहितीही नांदगावकर यांनी दिली.
ते म्हणाले की कणकवली, देवगड, वैभववाडीची आज बैठक होती. त्या बैठकीचा वृत्तांत राज ठाकरे यांना सांगण्यात आला. त्यानंतर लगेचच त्यांनी सिंधुदुर्ग कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. मुंबईहुन मनसेचे शंभर निवडक कार्यकर्ते येथे आले आहेत. ज्यांना खरेच पक्षासोबत काम करायचे आहे, याची चाचपणी करून ते सिंधुदुर्गची नवी कार्यकारिणी 20 तारखेपर्यंत तयार करतील, असेही त्यांनी सांगितले.