आताची मोठी बातमी | बारसुत घमासान | आंदोलक भिडले | पोलिसांचा लाठीचार्ज

बारसूला जाऊ या, शेतक-यांना न्याय देऊ : राजू शेट्टी
Edited by: प्रतिनिधी
Published on: April 28, 2023 16:16 PM
views 146  views

राजापूर : बारसू रिफायनरी प्रकल्पास विराेध करणा-या आंदोलकांवर शुक्रवार दुपारच्या सुमारास पाेलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये दोन आंदोलक जखमी झाले तर काहींना पाेलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा सारा प्रकार दडपशाहीचा असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि जालिंदर सिंग यांनी केली आहे. राज्यातील सर्व शेतक-यांनी बारसूला जाऊ या आणि शेतक-यांना न्याय देऊ असे आवाहन शेट्टी यांनी केले.


या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम थांबविण्यासाठीचा निर्धार आज स्थानिकांनी केला हाेता. त्यासाठी सकाळपासून बारसूच्या सड्यावर आंदोलक जमा झाले हाेते. त्या ठिकाणी पोलिसांचा माेठा फौजफाटा हाेता. पाेलिसांनी आंदाेलकांची भेट घेण्यासाठी आलेल्या खासदार विनायक राऊत यांना ताब्यात घेत राजापूर पाेलिस ठाण्यात नेलं.   दरम्यान, दुपारी तीनच्या सुमारास आंदाेलकांनी पाेलिसांनी उभारलेले बॅरिकेट्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी आंदाेलकांवर लाठीचार्ज केला. त्यात काहीजण जखमी झाले.


स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते जालिंदर सिंग हे आंदाेलकांची भेट घेण्यासाठी जात असताना त्यांना राजापूरात पाेलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी सिंग यांनी भूमीपुत्राच्या मागण्या शासनानं ऐकुन घ्याव्यात असे आवाहन केले. कोकणात प्रदुषण मुक्त प्रकल्प आणावेत. विकासाच्या गर्भात जे दात आणि नख आहेत त्याला आमचा विरोध राहणार असे सिंग यांनी नमूद केले.


ते म्हणाले दडपशाहीचे काम शासनाला शोभणारे नाही. अश्रृधूर आणि लाठीचार्ज करणे योग्य नाही. साडेअकरा कोटी महाराष्ट्राची जनता तिथे आली तर तुम्ही त्यांना अटक करणार का, असा सवाल जालिंदर सिंग यांनी केला.