
म्हापण : भाजपमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे . छुप्या बैठकांना कंटाळून स्थानिक भाजप चे कट्टर वेगवेगळे बहुसंख्य पदाधिकारी आपल्या पदांचे राजीनामे देवून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जोरदार चालू आहे.
म्हापणमध्ये नारायण राणे यांचे कट्टर समर्थक व राणे कुटुंबीयांना मानणारा मोठा गट आहे. परंतु अलीकडच्या राजकारणात म्हापण मध्ये भाजप पदाधिकारी यांच्या त दोन गट झाल्याचे पहावयास मिळत आहे. अगदी अलीकडे पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सुद्धा मूळ भाजपकडून उभे राहिलेले उमेदवार व भाजप उमेदवारांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडून आलेले उमेदवार यांनी आयत्या वेळी केलेल्या भाजप प्रवेशामुळे येथील अंतर्गत वाद उफाळून आला होता.