BIG BREAKING | जे केसरकरांना जमलं नाही, ते राणेंनी जमवलं !

राणेंच्या शब्दांवर विश्वास | 14 दिवसांनी 'डी. एड'चं उपोषण मागे
Edited by: देवयानी वरसकर
Published on: April 09, 2023 19:49 PM
views 1035  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गनगरी येथे सुरू असलेल डी.एड.च्या शिक्षकांचे उपोषण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आश्वासनानंतर अखेर स्थगित करण्यात आल आहे. गेले १४ दिवस हे उपोषण सुरू होत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून डीएड शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.