
सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
जिल्हाप्रमुखांकडे त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. उबाठा शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. श्री. डिसोझा आता कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागल असून त्यांच्या भूमिकेवर स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता राजकीय सुत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे श्री. डिसोझा कोणती भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सत्ताधारी पक्षाच्या ते संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.










