
बांदा : भारतीय जनता पार्टीचे व राजन तेली समर्थक रोणापाल सरपंच योगिता केणी ,उपसरपंच कृष्णा परब तसेच ग्रामपंचायत सदस्य नमिता शेगडे, अश्विनी गावडे, योगेश केणी व निगुडे गावचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे हे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत वेंगुर्ला येथे जाहीर प्रवेश करणार आहेत.
त्यामुळे भारतीय जनता पार्टीला हा मोठा धक्का इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघात पडणार आहे. कारण राजन तेली यांचे हे सर्व समर्थक असून त्यांचा विश्वास सार्थकी लावण्यासाठी आणि त्यांना या निवडणुकीत विजय मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार आहे असे ग्रामपंचायत सदस्य योगेश केणी यांनी सांगितले आहे गेली अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निगुडे, रोणापाल या ग्रामपंचायत वर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकत होता परंतु राजन तेली हे शिवसेना उबाठा गटात प्रवेश केल्यामुळे या भागात मोठा सुरुंग भारतीय जनता पार्टीला लागला आहे आता या दोन ग्रामपंचायती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे जाणार आहेत.