शिरोड्यात गोवा बनावटी दारूवर वेंगुर्ले पोलिसांची मोठी कारवाई

2 लाख 15 हजार 440 रुपयांचा मुद्देमालासह 1 जण ताब्यात
Edited by: दिपेश परब
Published on: October 11, 2023 18:28 PM
views 552  views

वेंगुर्ले : गोवा बनावटीची दारु वाहतुक प्रकरणात वेंगुर्ले पोलिसांनी शिरोडा मिठागर मार्गावर रात्री मोठी कारवाई केली. दारू व मारुती कार सह सुमारे २ लाख १५ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकाला ताब्यात घेतले आहे.

रेडी ते वेंगुर्ला जाणाऱ्या रस्त्यावर पेट्रोलिंग दरम्यान वेंगुर्ले पोलिसांनी शिरोडा मिठागर येथे भरधाव वेगात जाणारी मारुती सुझुकी अल्टो कार नंबर एम एच 07-AH -2207 या गाडीची थांबवून तपासणी केली असता गाडीमध्ये बेकायदा गोवा बनावटीची सुमारे सुमारे १ लाख ४५ हजार ४०० दारू आढळून आली. सायमन बसत्याव घोंसालविस, वय ५५ वर्षे, रा.  होडावडा गोसावीवाडी, ता. वेंगुर्ला हा मारुती सुझुकी अल्टो कार मध्ये ही दारू घेऊन जात होता. त्याच्यासह सर्व मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. आणि महाराष्ट्र दारूबंदी अधि. कलम ६५ (अ ) ( ई ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस भिसे, योगेश राऊळ, अजित जाधव यांनी सापळा रचून केलेली आहे.