अश्वत्थ मारुती मंदिराची पुनर्बांधणी !

मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते भूमीपूजन !
Edited by: भगवान शेलटे
Published on: December 23, 2023 16:10 PM
views 174  views

सावंतवाडी : सावंतवाडीतील अश्वत्थ मारुती मंदिराच्या शेडचे वादळीवाऱ्यामूळे झाड कोसळल्याने नुकसान झाले होते. त्याच्या पुनर्बांधणीच्या कामाचे भूमीपूजन मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून पुर्नबांधणीचे काम होत आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष देव्या सूर्याजी, माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, विकास गोवेकर, मंगेश चिटणीस, जितेंद्र सावंत, संजय चिटणीस, बबलू मिशाळ, किशोर चिटणीस, मेहर पडते, अर्चित पोकळे, संदिप निवळे, प्रथमेश प्रभू, साईराज नार्वेकर, महेश बांदेकर, नागेश जगताप, आबा चव्हाण, देवेश पडते यांच्यासह माठेवाडा येथील रहिवासी उपस्थित होते.