
सावंतवाडी : ताज हॉटेलचा डिझाईन पूर्ण झालं आहे. आता लवकरच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ताज हॉटेलच भूमिपूजन आणि दोन पंचतारांकित हॉटेलची उद्घाटन महिन्याभरात होणार आहेत. विकासकामांच्या उद्घाटनाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री गिरीश महाजन येणार आहेत अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात वेंगुर्ले येथे हाऊस बोट, स्कुबा डायव्हिंग असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन प्रकल्प येत्या दोन महिन्यात सुरु होणार आहेत. त्यामूळे जिल्यातील पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात वेगळी प्रवृत्ती येत आहे अशी प्रवृत्ती मी माझ्या मतदार संघात येऊ देणार नाही , जमीन मोजणीच्या वेळी बाऊन्सर घेऊन जाणे ही प्रवृत्ती घातक आहे. कंत्राटदारांना धमकावणे अशी ही प्रवृत्ती तुमच्या घरापर्यंत येईल. त्यामुळे वेळ पडल्यास अशा प्रवृत्तीला रोखण्यासाठी माझा लढा असेल आणि मी सर्वसामान्य जनतेसोबत राहीन. मी सर्वसामान्य नागरिक याच्या बाजूने राहणारा आहे. या जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामूळे मी जनतेच्या बाजूने राहणार असे त्यांनी सांगितले.