भोसले स्कूलच्यावतीने लहान मुलांसाठी रंगभरण स्पर्धेचं आयोजन

Edited by:
Published on: February 03, 2025 18:52 PM
views 21  views

सावंतवाडी : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने लहान मुलांसाठी ८ फेब्रुवारी रोजी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा दोन गटात होणार असून पहिला गट नर्सरी, ज्युनिअर व सिनिअर केजीसाठी तर दुसरा गट पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. स्पर्धेसाठी लागणारे रंग विद्यार्थ्यांनी आणायचे असून चित्र व कागद शाळेतर्फे पुरविण्यात येईल. विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल यावेळी मुलांच्या पालकांसाठी देखील रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नावनोंदणीसाठी ९४२२३८६६१४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे.