भोसले पॉलिटेक्निकचा तृतीय वर्ष निकाल जाहीर | ९१.८९ % गुणांसह सोमेश राजे कॉलेजमध्ये प्रथम

Edited by: विनायक गावस
Published on: July 12, 2023 14:19 PM
views 267  views

सावंतवाडी :  महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या उन्हाळी सत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत सुयश प्राप्त केले आहे. तृतीय वर्ष कॉम्प्युटर विभागातील विद्यार्थी सोमेश संजय राजे याने 92 टक्के गुणांसह संस्थेमध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला. कॉलेजच्या इतर विभागांचा निकालही उत्कृष्ट लागला असून विभाग निहाय यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे 

कॉम्प्युटर विभाग - सोमेश संजय राजे ९१.८९ टक्के प्रथम, शितल अर्जुन मिस्त्री ८९.२० टक्के द्वितीय, मानसी महेश आरोसकर ८८.१०% टक्के तृतीय, इलेक्ट्रिकल विभाग - पलाश गजानन धुरी ८६.६७ टक्के प्रथम, केतन संतोष पावस्कर ८५.८३ टक्के द्वितीय, विवेक मधुकर कविटकर ८५.०६ टक्के तृतीय, सिव्हिल विभाग - आदित्य महेश गोडे ८६.८४ टक्के प्रथम, केदारनाथ राजन गवस ८६.५३ टक्के द्वितीय, प्रथमेश दीपक गवस ८६.१६ टक्के तृतीय, मेकॅनिकल विभाग - मनीष तुषार राऊळ ८६.६४ टक्के प्रथम, मनीष यशवंत राऊळ ७९.५२ टक्के द्वितीय, नामदेव नरेश पायनाईक ७७.३४ टक्के तृतीय.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व प्राचार्य गजानन भोसले यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.