भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये राज्यस्तरीय पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा

Edited by: विनायक गांवस
Published on: February 08, 2024 11:36 AM
views 112  views

सावंतवाडी : येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई पुरस्कृत राज्यस्तरीय पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागासाठी आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले, परीक्षक म्हणून लाभलेले महावितरणचे सहाय्यक अभियंता दीपक खोब्रागडे, एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रा.ओंकार मराठे, प्रा. श्रुती हेवाळेकर, डी.फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे, सिव्हिल विभागप्रमुख प्रा.प्रसाद सावंत व मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा.अभिषेक राणे उपस्थित होते.

     

इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख प्रा. दीपक पाटील यांनी सुरुवातीला स्पर्धेची रूपरेषा स्पष्ट केली. त्यानंतर सुनेत्रा फाटक यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मुंबई विभागातून एकंदर एकोणीस गटांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. यापैकी शासकीय तंत्रनिकेतन मालवणच्या प्रथमेश साटम व ललित्य साळगावकर यांनी प्रथम, भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पूजा लांबर व संकेत सुतार यांनी द्वितीय तर प्रवीण पाटील कॉलेज ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, मुंबईच्या यश राठोड व वेदांत रायपुरे  यांनी तृतीय क्रमांक मिळवला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, ट्रॉफी व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन  प्रा.तेजा शेणई यांनी केले.