'नायपर'मध्ये भोसले कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं सुयश !

Edited by: विनायक गांवस
Published on: June 26, 2024 09:14 AM
views 123  views

सावंतवाडी : नायपर-२०२४ या राष्ट्रीय स्तरावरील संयुक्त प्रवेश परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, फार्मास्युटिकल्स विभाग, रसायने आणि खते मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या तीन विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे.

     

आपली उज्वल परंपरा कायम ठेवत चालू वर्षीही कॉलेजच्या तेजस नरेश वाडेकर, सार्थक गणेश खमितकर व प्रिया सुभाष वीणकर यांनी राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करताना अनुक्रमे १६४३, ३९२७ व ५३५३ ऑल इंडिया रँकिंग प्राप्त केली आहे.या परीक्षेच्या सरावासाठी कॉलेजने स्वतंत्र मार्गदर्शन तासिका घेऊन विद्यार्थ्यांना सहकार्य केले होते. वर्षभर घेतलेल्या विशेष तासिका, परीक्षा अभ्यासाचे नियोजन व विद्यार्थ्यांची मेहनत या मुळेच हे यश प्राप्त झालयाचे प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनी सांगितले. नायपर प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेलया विद्यार्थ्यांना गुणवत्ते आधारे औषधर्माणशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाला (MS) प्रवेश दिला जातो. परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीदेखील मिळणार आहे.विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य डॉ. विजय जगताप व परीक्षा मार्गदर्शक प्रा.डॉ.प्रशांत माळी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.