भोसले पॉलिटेक्निकचा हिवाळी सत्र निकाल 97 टक्के

मेकॅनिकल - सिव्हिल विभागाचा 100 टक्के निकाल
Edited by: विनायक गांवस
Published on: January 07, 2026 15:19 PM
views 32  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या पदविका अभियांत्रिकी हिवाळी सत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (भोसले पॉलिटेक्निक) या संस्थेने घवघवीत यश संपादन केले आहे. संस्थेचा एकूण निकाल ९७ टक्के लागला आहे. यापैकी तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागातून परीक्षेला बसलेल्या ५६ पैकी ५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये साहिल विनोद देसाई (८९. ५३%) याने प्रथम, प्रथमेश गोपाळ कणेरकर (८८.५९%) याने द्वितीय, तर मकरंद भरमानी तीरवीर (८७.७७%) याने तृतीय क्रमांक प्राप्त केला.

तृतीय वर्ष सिव्हिल विभागातून परीक्षेला बसलेल्या २६ पैकी २६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये औधव विलास भिके (८६.८९%) याने प्रथम, आयुष विशाल नार्वेकर (८६.४४%) याने द्वितीय, तर तनिष्का गुरुप्रसाद गवस (८६.३३%) हिने तृतीय क्रमांक मिळवला. तृतीय वर्ष कॉम्प्युटर विभागातून परीक्षेला बसलेल्या १३१ पैकी १२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विभागाचा निकाल ९७ टक्के लागला आहे. यामध्ये विधी विक्रम कोटणीस (९४.९४%) हिने प्रथम, उर्वी विजय आंदुर्लेकर (९३.२९%) हिने द्वितीय, तर नंदिनी संजीव कुमार सिंग (९२.३५%) हिने तृतीय क्रमांक पटकावला. तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल विभागातून परीक्षेला बसलेल्या ५१ पैकी ४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विभागाचा निकाल ९२ टक्के लागला आहे. यामध्ये पारस गंगाराम मिस्त्री (८९%) याने प्रथम, जयराम रघुनाथ सापळे (८६.५९%) याने द्वितीय, तर नमिता सुभाष मोरजकर (८६%) हिने तृतीय क्रमांक मिळवला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, प्राचार्य डॉ.रमण बाणे व उपप्राचार्य गजानन भोसले यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.