लोरे नं२ पेडणेकरवाडी येथील रस्त्याचे भूमिपूजन !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 09, 2024 14:58 PM
views 100  views

वैभववाडी : लोरे पेडणेकरवाडी येथील रस्त्याचे भूमिपूजन माजी सरपंच  महेंद्र रावराणे यांच्या हस्ते झाले.येथील ग्रामस्थांनी याबाबत समाधान व्यक्त केले.

 दलीतवस्ती विकास योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्याचे आज भूमिपूजन करण्यात आले. हा रस्ता मंजूर होण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य विनोद पेडणेकर यांनी पाठपुरावा केला होता. अखेर या रस्त्याच्या डांबरीकरण कामाला मंजुरी मिळाली. त्या कामांचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी सरपंच विलास नावळे, उपसरपंच रुपेश पाचकुडे, सदस्य विनोद पेडणेकर, रितेश सुतार यासह ग्रामस्थ उपस्थित होते. हा रस्ता मंजूर झाल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे विशेष आभार मानले.