चाफेखोलातील मुख्य रस्त्याचे भूमिपूजन

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: February 20, 2024 14:50 PM
views 73  views

मालवण : चाफेखोल येथील मुख्य रस्त्याचे भूमिपूजन शिवसेनेचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुख  बबन शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या माध्यमातून यापुढेही विकासकामांसाठी कोट्यवधी निधी आणला जाईल असे यावेळी बबन शिंदे यांनी सांगितले.

यावेळीउपतालुकाप्रमुख पराग खोत, मालवण शहर प्रमुख बाळू नाटेकर, सुकळवाड जि.प. विभाग प्रमुख अल्पेश निकम, चाफेखोल सरपंच सौ. रविना घाडीगावकर, उपसरपंच  रविंद्र जाधव, पोईप शाखाप्रमुख श्री. नारायण राणे, चाफेखोल ग्रामपंचायत सदस्य सौ वैशाली गावडे, पूनम घाडीगांवकर, उमेश घाडीगांवकर, ग्रामसेविका  स्वाती कदम, शिवाजी पडवळ, काशिराम घाडीगांवकर विलास पताने, दीपक कदम, संजय देसाई, सरोज बावळेकर, यशवंत घाडीगांवकर, हरीचंद्र इंदुलकर,  प्रभाकर इंदुलकर, शशिकांत घाडीगांवकर, सचिन घाडीगांवकर, विशाखा पताने, संतोष निकम यासह चाफेखोल ग्रामस्थ उपस्थित होते.