माड्याचीवाडीत पुलाच्या कामाचं आ.नाईकांच्या हस्ते भूमिपूजन..!

Edited by:
Published on: March 05, 2024 10:07 AM
views 131  views

कुडाळ : आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी रायवाडी ब्राम्हण मंदिर येथील पुलासाठी ३० लाख रु. मंजूर केले आहेत. या पुलाच्या कामाचे भूमिपूजन आ. वैभव नाईक यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. गेली अनेक वर्षे ग्रामस्थांकडून पुल बांधण्याची मागणी होत होती. आ. वैभव नाईक यांनी हि मागणी पुर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे,तेंडोली विभागप्रमुख संदेश प्रभू,सुभाष परब,सचिन गावडे,अस्मिता गावडे,परशुराम गावडे,स्वप्नील गावडे,राजन गावडे,विजय गावडे,भास्कर गावडे,कांचन डिचोलकर,प्रथमेश गावडे,महादेव गावडे,दाजी वारंग आदींसह शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.