
मालवण : खासदार नारायण राणे यांच्या खासदार निधीतून कोळंब ग्रामपंचायत हद्दीतील आडारी वाडीत मंजूर झालेल्या स्ट्रीट लाईटच्या कामाचे आज माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या उपस्थितीत जेष्ठ ग्रामस्थ हरिश्चंद्र ढोलम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आज भूमिपूजन करण्यात आले.
आडारी वाडीत स्ट्रीट लाईट बसावी अशी मागणी ग्रामस्थांनी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार माजी खासदार निलेश राणे यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून चार लाख रुपये निधी दिला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर यांनी काम मंजुरीसाठी पाठपुरावा केला. चार लाख निधीतून संपूर्ण आडारी वाडी प्रकाशमान होणार आहे. याबाबत ग्रामस्थांनी खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.
आज या कामाचे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अशोक सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत वाडीतील जेष्ठ ग्रामस्थ हरिश्चंद्र ढोलम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी सरपंच सिया धुरी, विजय ढोलम, तातोबा करलकर, ग्रामपंचायत सदस्य भाऊ फणसेकर, भाई ढोलम, रामदास ढोलम, हनुमंत ढोलम, बबन मलये, अनिल मलये, सुरेश ढोलम, राजू ढोलम, विकास ढोलम, अरुण ढोलम, आत्माराम ढोलम, विशाल ढोलम, सागर ढोलम, रघुनाथ ढोलम, सारिका ढोलम, रेखा ढोलम, सिया ढोलम, स्वाती ढोलम, स्नेहल ढोलम, विशाखा ढोलम, स्वप्नाली मलये, काजल ढोलम, यासह अन्य उपस्थित होते.