साटेली भेडशीतील क्रीडा संकुल इमारत कामाचं भूमिपूजन

Edited by:
Published on: June 06, 2023 20:10 PM
views 147  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी येथील तालुका क्रीडा संकुल इमारतीचे बांधकाम करणे या कामाचा भूमिपूजन सोहळा मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाल्याचे घोषित करण्यात आले.

साटेली भेडशी येथील नियोजित तालुका क्रीडांगण संकुल या ठिकाणी मंगळवारी सकाळी ब्राम्हण पुरोहित करवी उपसरपंच गणपत डांगी यांच्याहस्ते धार्मिक विधी करण्यात आले. यावेळी साटेली भेडशी सह परिसरातील ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी, तालुका जिल्हा पातळीवरील संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी , तालुका क्रीडांगण पदाधिकारी उपस्थित होते. साटेली भेडशी या नियोजित तालुका क्रीडा संकुल येथे मोठ्या स्क्रीनवर ऑनलाईन भूमीपूजन कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले होते.

मंगळवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजन कार्यक्रम करण्यात आले. यात दोडामार्ग  यात दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी येथील  तालुका क्रीडा संकुल इमारतीच्या बांधकाम कामाचे मुख्यमंत्र्यांनी  ऑनलाईन पद्धतीने केले.त्यानंतर साटेली भेडशी येथील  नियोजित तालुका क्रीडांगण येथे उभारण्यात आलेल्या भूमिपूजन कार्यक्रम कोनशीलाचे अनावरण उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ, क्रीडापेमी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उपसरपंच गणपत डांगी, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र भिसे, नामदेव धर्णे, प्रकाश कदम, राजेंद्र निंबाळकर, नंदकिशोर टोपले, तुकाराम टोपले, गोपाळ गवस, श्रीकांत केसरकर, नंदकिशोर म्हापसेकर,पांडुरंग लोंढे, राजाराम टोपले, राजाराम टोपले, राजन मुंज, पंढरीनाथ देऊलकर, गजानन देऊलकर, अनिल मोरजकर, विष्णू मुंज, सिद्धेश पांगम,  दादा केसरकर, क्षितिज मणेरकर, निखिल जुवेकर, प्रसाद सरवणकर ,सनी केसरकर, ज्ञानेश्वर डांगी, पुरोहित अभय आठलेकर, मंडळ अधिकारी प्रेमानंद सावंत, तालुका क्रीडा अधिकारी एस पी देशपांडे, सार्वजनिक बांधकाम सहाय्यक अभियंता श्री. घंटे, श्री.ठाकरे, विजय भागानगरे, आदि क्रीडा प्रेमी ,ग्रामस्थ तालुका क्रीडांगण  पदाधिकारी, विविध गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आधी उपस्थित होते.

दोडामार्ग तालुक्यात सुसज्ज शासकीय क्रीडा संकुल व्हावे अशी मागणी क्रीडा प्रेमी नागरिकांतून होत होती.यासाठी भेडशी ग्रामस्थांनी पुढाकार घेत साटेली भेडशी हद्दीतील शासकीय जागा निश्चित करून ती जागा क्रीडा संकुलासाठी मिळावी यासाठी पाठपुरावा केला.तसेच येथील ही उपलब्ध  जागा युवावर्ग ग्रामस्थ यांनी अंगमेहनत श्रमदानातून खेळण्यायोग्य केली.याच ठिकाणी विविध क्रीडा ,क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करून जमणाऱ्या निधीतून या जागेची सुधारणा केली. त्याचबरोबर ही शासकीय जागा क्रीडा संकुलासाठी मिळावी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला. आणि ही जागा क्रीडा विभागाच्या ताब्यात वर्ग करण्यात आली यात भेडशीतील 15 ते 20 वर्षांपूर्वी च्या तत्कालीन युवा वर्गाचा मोठा वाटा आहे. अखेर मागील काही वर्षात सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे स्थानिक आमदार विद्यमान शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करीत दोडामार्ग तालुका क्रीडा संकुल  म्हणून मंजुरी मिळवत निधी मंजूर केला. निधी मंजुरी नंतरही प्रत्यक्ष कामास विलंब होत असल्याने उपसरपंच गणपत डांगी यांच्या नेतृत्वाखाली साटेली भेडशी ग्रामस्थ  व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत  याच नियोजित मैदानावर उपोषण करून लक्ष वेधण्यात आले.अशा अनेकांच्या एकत्रित प्रयत्नांनातुन तालुका क्रीडा संकुल इमारतीचे बांधकाम करणे या कामाचा भूमिपूजन पार पडलं. त्यामुळे तालुक्यातील क्रीडा प्रेमी नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.